Elon Musk, Warren Buffett, Bill Gates : Success Stories Of Powerful Businessmen Combo Pack in Marathi (Set of 3 Books Motivation) मराठी पुस्तके


Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]

From the Publisher

Elon Musk : Business Principles from the World’s Most Powerful Entrepreneur

Elon Musk : Business Principles from the World's Most Powerful Entrepreneur

Elon Musk : Business Principles from the World's Most Powerful Entrepreneur

तुम्ही मस्कच्या तोडीचे उद्योजक असणं अजिबात गरजेचं नाही; किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी त्या तोडीचं द्रष्टेपण अंगी असण्याचीही अजिबात गरज नाही. या पुस्तकात नमूद केलेले अंतर्ज्ञान, सर्व लहान पातळीवरच्या उद्योजकांसाठीच अभिप्रेत आहे. शक्य तेवढी यशश्री मिळवायची असेल, तर तुम्ही आपल्यापुढे जी उद्दिष्टं ठेवता, ती तुम्हाला वाटत असलेली उत्कट ओढ, तुमचं व्यक्तिमत्त्व आणि तुमची यशाची व्याख्या यांना साजेशी असायला हवीत!

मस्कनं या गोष्टी नक्कीच केलेल्या आहेत आणि इच्छा असेल, तर इतर कुणीही त्या गोष्टी नक्कीच करू शकेल.

तुमच्या स्वत:बद्दलचं अंतर्ज्ञान तुम्हाला मिळवून देणं, हा या पुस्तकाचा मूलभूत हेतू आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो हे शोधून जर तुम्ही या पुस्तकात वर्णन केलेले काही गुण आत्मसात केलेत, तर त्याचा कोणत्याही धंद्याला नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे तुमचा नफाही खूप वाढू शकेल. त्यामुळे तुमच्या आयुष्याचा दर्जासुद्धा नक्कीच उंचावेल.

एलॉन मस्क आचरत असलेली सोळा तत्त्वं, जी प्रत्येक उद्योजकाला उद्बोधक ठरतील.

त्याच्या स्वत:च्या शब्दांत सांगायचं तर: ‘जर तुमच्याकडे लक्षवेधी, चित्ताकर्षक माल, आकर्षक किमतीला उपलब्ध नसेल, तर तुमची कंपनी महान असणं शक्यच नाही!’ अशी कंपनी उभारता येण्यासाठी आवश्यक अशी सोळा तत्त्वं किंवा सोळा गुण :

1. कुतूहल असणं

2. निरीक्षणात वाक्बगारी

3. तज्ज्ञ

4. विश्लेषक

5. मोठे प्रश्न विचारता येण्याची क्षमता

6. चाकोरी मोडून बाहेर पडण्याचं धाडस

7. उच्च उद्दिष्टं डोळ्यांपुढे ठेवण्याची धडाडी

8. नेतृत्वगुण

9. माणसं जोडण्याचं कौशल्य

10. लोकांचं मोल आणि महत्त्व जाणण्याची कुवत

11. प्रकल्प कृतीत उतरवण्याचं कौशल्य

12. धोका पत्करण्याचं धाडस

13. अडथळ्यांवर मात करण्याची कुवत

14. दर्जेदार उत्पादन करण्याची क्षमता

15. सतत, थोड्या थोड्या सुधारणा घडवत जाण्याबद्दल आग्रही असणं

16. ध्येयानं पछाडणं आणि त्यासाठी जबरदस्त चिकाटीनं प्रयत्न करणं

आपल्या विचारांचं आपल्यावर कसं नियंत्रण असतं, हे सांगणारं विज्ञान

आपल्या स्वत:च्या विचारमंथनाबाबतचं तुमचं मत हे पुस्तक वाचल्यावर नेहमीसाठी बदलून जाईल. डॉ. ब्रुस एच. लिप्टन या प्रख्यात पेशीशास्त्रज्ञानं आपल्या विचारांचा आपल्या शरीरातल्या पेशींवर कसा प्रभाव पडत असतो, याबद्दलचे धक्कादायक नवीन वैज्ञानिक शोध या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. मेंदूच्या कार्याच्या जैवरासायनिक परिणामांमुळे पेशी प्रभावित होत असतात. विचारांचा पेशींवर कसा परिणाम होतो, हे लिप्टन यांनी अगदी रेण्वीय पातळीवरच्या घडामोडी समजावून देत स्पष्ट केलं आहे. हलकासा विनोदाचा शिडकावा करणाऱ्या साध्या-सोप्या भाषेत मुद्दा समजावून सांगणं आणि दैनंदिन जीवनातली उदाहरणं देणं ही त्यांच्या लिखाणाची उल्लेखनीय वैशिष्ट्यं.

अ‍ॅपिजेनेटिक्स हे नवं विज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, तसंच संपूर्ण मानवजातीच्या आयुष्यावर कसं परिणाम करतं या संशोधनाचे निष्कर्ष, आपल्या आतापर्यंतच्या जीवनाबद्दलच्या संकल्पनांना आमूलाग्र बदलून टाकणारे आहेत. आपली जनुकं आणि डीएनए आपल्या आयुष्याचं नियंत्रण करीत नाहीत, तर पेशीच्या बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या संदेशांमुळे डीएनएचं नियंत्रण होत असतं. पेशीबाहेरच्या वातावरणातून मिळणाऱ्या संदेशांमध्ये आपल्या (सकारात्मक किंवा नकारात्मक) विचारांतून तयार होणाऱ्या ऊर्जातरंगांचाही समावेश असतो, असं लिप्टन म्हणतात.

पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधारानं केलेलं हे संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध, अशी प्रशंसा होत आहे. आपल्या विचारांना योग्य ते वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असं हे संशोधन सांगतं.

Warren Buffett

Warren Buffett

Warren Buffett

वॉरन बफे यांचा सर्वांगीण परिचय करून देणं हे खरंतर एक मोठं आव्हानच! गुंतवणूक क्षेत्रात लक्ष घालून अवघ्या तेहतिसाव्या वर्षी दशलक्षाधीश झालेल्या वॉरन बफे यांनी गुंतवणुकीत यश मिळावं यासाठी स्वत:चे काही नियम तयार केले आहेत आणि त्यामुळं आजपर्यंत त्यांना गुंतवणुकीमध्ये कधीही विशेष धोका पत्करावा लागला नाही. वॉरन बफे यांचा व्यावसायिक क्षेत्रातील पराक्रम कसा वाढत गेला याची या पुस्तकात डॉ. राशिंगकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. एवढं प्रचंड यश मिळूनही वॉरनला अहंकाराचा स्पर्शही झालेला नाही. स्वत:च्या उत्पन्नातील 90 टक्के पैसा उदारहस्ते त्यांनी सामाजिक कार्याकरिता दिला आहे. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील महामेरू असलेल्या व्यावसायिकाकडून भारतातील सर्व व्यावसायिकांनी बोध घ्यायलाच हवा. या आगळ्यावेगळ्या गुंतवणूकसम्राटाच्या योगदानाचा यथोचित परामर्श घेणारं हे पुस्तक संग्राह्य असंच आहे.

– डॉ. प्र. चिं. शेजवलकर

माजी अध्यक्ष

महाराष्ट्र साहित्य परिषद

खेळण्याच्या वयात कोकच्या 6 बाटल्यांचा संच विकून 5 सेंटस्चा स्वकष्टार्जित नफा मिळवणार्‍या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय?

कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात अत्यंत दुर्मिळ असणार्‍या संपूर्ण नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणार्‍या बोटांवर मोजता येण्याइतक्याच व्यक्ती जगात असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी 90 टक्के संपत्ती कुठलाही गाजावाजा न करता समाजाला परत देणं हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.

‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचार्‍यांनाही यशाचं क्षितीज दाखवणार्‍या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.

त्या सार्‍या तुम्हा वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!

विशेष म्हणजे वॉरनने स्वत: सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या 10 मार्गांसह!खेळण्याच्या वयात कोकच्या 6 बाटल्यांचा संच विकून 5 सेंटस्चा स्वकष्टार्जित नफा मिळवणार्‍या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय?

कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात अत्यंत दुर्मिळ असणार्‍या संपूर्ण नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणार्‍या बोटांवर मोजता येण्याइतक्याच व्यक्ती जगात असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी 90 टक्के संपत्ती कुठलाही गाजावाजा न करता समाजाला परत देणं हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.

‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचार्‍यांनाही यशाचं क्षितीज दाखवणार्‍या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.

त्या सार्‍या तुम्हा वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!

विशेष म्हणजे वॉरनने स्वत: सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या 10 मार्गांसह!

Bill Gates: Success Secret

Bill Gates: Success Secret

Bill Gates: Success Secret

बिल गेट्स हे एक अफाट यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेच. इतक्या कमी वयात एवढे अफाट यश मिळविणारी त्यांच्यासारखी जगात दुसरी व्यक्ती दुर्मीळ. त्याचप्रमाणे ते अत्यंत चिंतनशील असेही व्यक्तिमत्त्व आहे.

आपल्या उपजत कुशाग्र बुद्धीच्या जोरावर, अनुभवाच्या प्रशाळेतच त्यांची खरी जडणघडण झाली.

बिल गेट्स यांचं जीवन, त्यांना मिळालेलं यश, त्यांच्यावरच्या केसेस, वादविवाद हे सगळंच मोठं झंझावाती आहे. विलक्षण वेगवान आहे.

त्याची श्रीमंती, ते मिलियन, बिलियन डॉलर्सचे अवाढव्य आकडे वगैरेच्या पलीकडे हा कोण माणूस आहे, त्याचा शोध घेणे यावर आमचा भर आहे. तो शोध कितपत जमलाय ते वाचक ठरवतीलच.

कॉम्युटर सुरू केल्यावर सर्वप्रथम मायक्रोसॉफट कंपनीचा लागो कॉम्युटरच्या पटलावर आपल्याला दिसतो. या यशस्वी कार्यप्रमाणीचा आद्यप्रणेता व संस्थापक म्हणजे बिल गेट्स! खर्या अर्थाने संगणकयुगाची नांदी करणार्या, झंझावाती व प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणे तितकेच रोमहर्षक आहे.

व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ प्रगाढबुद्धिमत्ता, अथक परिश्रम व आव्हानांना पेलण्याची दुर्दम्य इच्छा याद्वारे आपले परिश्रम साम्राज्य कसे उभारतो व ते कसे टिकवतो, हे जाणून घेणे निश्चितच अचंबित करणारे आहे; परंतु त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त भाग वंचितांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी व गरजूंच्या शिक्षणासाठी खर्च करून बिल गेट्स यांनी सगळ्यांनाच एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. अत्यंत प्रतिभासंपन्न, दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाचा माणूस व उद्योजक म्हणून आढावा घेणारे आणि बिल गेट्स या थक्क करणार्या रसायनाबाबत वाचकांच्या उत्सुकतेला न्याय देणारे पुस्तक.

ASIN ‏ : ‎ B09C1NT86P
Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2021)
Language ‏ : ‎ Marathi
Item Weight ‏ : ‎ 200 g

[ad_2]

error: Alert: Content selection is disabled!!