Kashala Hava To Chashma: How to Improve Your Eyesight Naturally कशाला हवा तो चष्मा ?


Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]

From the Publisher

Kashala Hava To Chashma: How to Improve Your Eyesight Naturally by Balkrishna Khare

Kashala Hava To Chashma: How to Improve Your Eyesight Naturally

Kashala Hava To Chashma: How to Improve Your Eyesight Naturally

आपल्या सर्व इंद्रियांमध्ये ज्ञानेंद्रिये महत्त्वाची व ज्ञानेंद्रियांत डोळा महत्त्वाचा. त्याचा भाग सर्व ज्ञानेंद्रियांत 80 टक्के आहे, असे सर्वजण समजतात. उत्तम दृष्टीला कोणाच्याही जीवनात पर्याय नाही. हे आपल्याला दृष्टी मंद झाल्यावर, मोतीबिंदू किंवा काचबिंदू झाला तरच समजतं व जीवन लाचार व परावलंबी बनतं. म्हणूनच दृष्टीची खरी किंमत ती चांगली असतानाच समजली तर ते शहाणपण. दृष्टी ही मौलिक गोष्ट आहे हे माहीत असूनसुद्धा आपण डोळ्यांची काळजी घेत नाही. ती कशी घ्यावी याचा विचार करीत नाही. बहुतेक लोकांचे डोळे त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे व निष्काळजीपणामुळे बिघडतात ही सत्य स्थिती आहे. शंभर वर्षांपूर्वी डॉ. विल्यम बेट्स यांनी प्राण्यांवर व पेशंटवर संशोधन केले. ते म्हणतात, ताणतणावविरहित व सूर्यस्नान मिळालेले डोळे कधीही खराब होत नाहीत. डॉ. बेट्स यांच्या मते डोळ्यांना शिक्षण देऊन व व्यायाम करून दृष्टी चांगली होऊ शकते. जे आपली प्रकृती नैसर्गिक पद्धतीने निरोगी ठेवू इच्छितात अशा अनेकांना हे पुस्तक निश्चित अतयंत मौल्यवान माहिती पुरवील.

माणूस कितीही हुशार झाला तरी ईश्वरनिर्मित गोष्टीशी तो बरोबरी करू शकत नाही. काही जणांची दृष्टी इतकी चांगली असते, की नुसत्या डोळ्यांनी ते अनेक गोष्टी अचूक पाहू शकतात. ही दैवी देणगीच म्हणावी लागेल; पण ही देणगी जन्मजात लाभलेल्यांनी जर त्याचा दुरुपयोग केला, आहार-विहार नीट ठेवला नाही व मनाची संतुलितता राखली नाही, तर त्याचा र्‍हास होण्यास वेळ लागत नाही. दैव देते व कर्म नेते असे म्हणतात तेच खरे. असे होऊ नये म्हणून निसर्गोपचार, योगसाधना, प्राणायाम, योगासने आणि डोळ्यांचे व्यायाम याद्वारे चष्मा घालविण्याचे यशस्वी तंत्र या पुस्तकात सोप्या पद्धतीने आणि आकृतीच्या मदतीने सांगितले आहे. चष्मा हा दागिना नाही. तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीस या पद्धतीने प्रयत्न केल्यास, व्यायाम-आसने-प्राणायामाद्वारे सहज घालविता येतो.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Fifth edition (1 January 2016); Saket Prakashan Pvt Ltd
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 88 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177866184
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177866186
Item Weight ‏ : ‎ 490 g
Dimensions ‏ : ‎ 20.8 x 13.8 x 0.5 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Generic Name ‏ : ‎ Marathi Book

[ad_2]