Pathlag – Marathi


Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]

From the Publisher

Pathlag by Narayan Dharap

Pathlag Pathlag

1997 च्या राजकीय परिस्थिीतीची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. त्यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा अति दारूण पराभव झाला होता. सर्वत्र राजकीय अस्थिरता दिसत होती. हीच परिस्थिती आणखी पुढे गेली तर काय? हेच बृहद्लेखन या कादंबरीत आहे. याबरोबरच ही कादंबरी वाचकाला दुसऱ्या एका विश्वात घेऊन जाते.

इलेक्ट्रॉनिक वर्तमानपत्रे, थंबप्रिंटने उघडणारी दारं, क्रेडिट कार्ड, मायक्रोट्रान्समीटर्स, व्हिजीफोन, चाळीस चाळीस मजल्यांचे स्कायस्क्रेपर्स, हेलिपॅड, मुंबई बंदराभोवतालचा सागरतट, विवाह करार, रॉकेट प्रवास, सायकोग्राफ… या सर्व गोष्टी माझ्या कल्पनेतून आल्या आहेत.

———————————————————————————–

विज्ञानाला सीमा नाही. आज केवळ कल्पनेत असलेल्या अनेक गोष्टी उद्या साकार होतात. केवळ कल्पना म्हणून कोणतीही गोष्ट नाकारण्यात शहाणपणा नसतो. काळाच्या गर्भात काय काय दडलेले आहे, याचा आज थांग लागत नाही; कारण उद्या सर्वस्वी नवीन असतो. आज नेहमीच उद्याचा पाठलाग करीत असतो.

काळाशी स्पर्धा करीत असा पाठलाग सुरू होतो तेव्हा मग मानवी भावभावनांचे विश्वही हादरून जाते. मानवी संस्कृती उद्याच्या दिशेने धावायला लागते, तेव्हा आजच्या पावलाखाली काल तुडविला जातो. कालपर्यंत ज्यांना डोक्यावर घेऊन नाचत होतो अशा अनेक गोष्टी, संस्कार आणि विचार आज पायदळी तुडविले जातात; कारण उद्याचे आकर्षण खूप मोठे असते.

उद्याच्या उदरात काय दडले आहे याचा शोध घेण्यात असतो थरार, उत्साह आणि काळजाला घर पाडणारी एक अनामिक भीती. भीती आणि थरार यांच्या मिश्रणातून उदयाला येते उत्कटता. पुढे काय, पुढे काय? ही अपेक्षाच उत्कटतेच्या मुळाशी असते.

आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपण कल्पनाही न केलेल्या घटना एकापाठोपाठ वेगाने घडत जातात तेव्हा मनातल्या उत्कटतेचे रहस्यात रूपांतर होते.

अशाच उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय घटनांचा थरार असलेली नारायण धारप यांची कादंबरी.

Narayan DharapNarayan Dharap

Narayan Dharap

शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Fourth edition (1 January 2018)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 120 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352201264
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352201266
Item Weight ‏ : ‎ 140 g
Dimensions ‏ : ‎ 14 x 14 x 21 cm
Country of Origin ‏ : ‎ India

[ad_2]

error: Alert: Content selection is disabled!!